
सामना ऑनलाईन । जुन्नर
ग्रामीण पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या संयुक्त कारवाईत जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे स्फोटकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राजाराम किसन अभंग (71) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. राजारामकडे चार पाइपबॉम्ब बनकिण्यासाठी तयार केलेले स्ट्रक्चर पाइप, दोन इलेक्ट्रिक गनमशीन, गन पाकडर असा शस्त्रसाठी सापडला तर सांगलीमधून तलवारी आणि कोल्हापूर, गगनबावडा येथून एअर गनसह इतर शस्त्रास्त्रे सापडली.






























































