
पंजाबच्या अमृतसरमध्ये एका दांपत्याचा एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या व्यक्तीची पत्नी आपल्या प्रियकरासोबत हॉटेलच्या रुममधून बाहेर पडली तसा पती संतापला आणि त्याने त्या महिलेवर हात उगारला. सपासप चापट लगावत असतानाचा त्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
महिला पतीकडून घटस्फोट घेण्याच्या तयारीत होती. मात्र पतीकडून पैसे मिळाल्यावर महिलेने घटस्फोट देण्यास नकार दिला. महिलेच्या पतीला कळाले की त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत एका खासगी हॉटेलमध्ये उतरली आहे. मग तो आपल्या काही मित्रांसह त्या हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलमध्ये सर्वांसमक्ष त्याने पत्नीला मारहाण केली.
ही व्यक्ती स्वत: पेशाने पोलीस कांस्टेबल आणि जालंधर येथे वास्तव्याला आहे. त्याची पत्नी गुरदासपुरची आहे आणि तिचा प्रियकर एसजीपीसी कर्मचारी आहे. पतीने आरोप केला आहे की त्याच्या पत्नीचे कोणत्यातरी व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहे. आणि ती पतीची फसवणूक करत आहे. त्याला कळाले की त्याची पत्नी प्रियकरासोबत एका हॉटेलमध्ये उतरली आहे तेव्हा त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी तो आपल्या मित्रांना घेऊन तिथे दाखल झाला.
कांस्टेबलच्या माहितीनुसार, सहा वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. त्याचा आरोप आहे की, पत्नी छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण उकरून काढायची. भांडण इतकं टोकाला जायचं की ती माहेरी निघून जायची. अखेर घटस्फोटापर्यंत गेलेलं प्रकरण पंचायतीने रोखलं आणि दोन्ही कुटुंबांना समजावून त्यांना जालंदरमध्ये एकत्र राहण्यास सांगितलं.
कांस्टेबल म्हणाला की पत्नी तासंतास मोबाइलवर व्यस्त रहायची. त्यामुळे तिच्या चारित्र्यावर त्याला संशय आला. त्यामुळे तिच्यावर त्याने नजर ठेवली. रंजीत एवेन्यू ठाण्याचे पोलीस निरीक्षक रॉबिन हंस यांनी सांगितले की प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रेमी जोडप्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.


























































