बोंबला! माहेरचा म्हणत घरात ठेवले, 15 वर्षीय प्रियकराला 35 वर्षीय महिलेसोबत पतीने रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल पोहोचला असून प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रियही असतो. खरे तर सोशल मीडियाचा वापर आपल्या ज्ञानात भर पडावी म्हणून करावा हा यामागील उद्देश असला तरी काही जण याचा चुकीचा वापरही करतात. अनेकदा अशी प्रकरणही समोर आली असून यामुळे कुटुंबांमध्ये कलहही निर्माण होतो. असाच एक प्रकार बिहारमधील जमुई जिल्ह्यात उघडकीस आला आहे. येथे दोन मुलांची आई चक्क दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडली. सध्या याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.

जमुई जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी 35 वर्षीय विवाहित महिला दहावीमध्ये शिकणाऱ्या 15 वर्षाच्या मुलाच्या प्रेमामध्ये पडली. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोघे एकमेकांच्या संपर्कामध्ये आले होते. प्रेम एवढे वाढले की महिलेने चक्क मुलाला आपल्या घरी बोलावून घेतले आणि हा मुलगा आमच्या माहेरचा असल्याचे सांगत त्याला घरामध्ये ठेवले. रात्रीच्या सुमारास पतीने पत्नीचे मुलासोबत अश्लिल वर्तन सुरू असल्याचे पाहिल्यावर त्याच्या रागाचा पारा चढला. यानंतर दोघांनाही गावातील मंदिरासमोर उभे करून रक्तबंभाळ होईपर्यंत मारण्यात आले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत ‘जागरण’ने वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, दोन मुलांची आई असणारी 35 वर्षाची महिला फेसबुक मेसेंजरवर तासंतास पडीक असायची. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिची ओळख जहानाबादमध्ये दहावीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलाशी झाली होती. दोघेही सुरुवातीला टेक्स्ट मेसेजवर आणि नंतर व्हिडीओ कॉलवर बोलू लागले. महिलेचा मुलावर जीव जडला आणि तिने त्याला आपल्या घरी बोलावले. मुलगाही जहानाबादहून जमुई जिल्ह्यातील महिलेच्या घरी आला.

महिलेने हा मुलगा आमच्या माहेरून आल्याचे कुटुंबियांना सांगितले. मात्र रात्री त्याच्यासोबतच अश्लिल चाळे करू लागली. महिलेच्या पतीने दोघांनाही आक्षेपार्ह स्थितीत पकडले. त्यानंतर गावातील मंदिरासमोर पती आणि गावकऱ्यांनी दोघांचीही धुलाई केली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये महिला मुलाला कुशीमध्ये घेऊन त्याला वाचवताना दिसतेय, तर दुसरीकडे तिचा नवरा आणि गावकरी तिला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करताहेत. याची माहिती मिळकात मुख्याधिकारी आणि घटनास्थळी पोहोचलेल्या इतर ज्येष्ठ नागरिकांच्या मधस्थीने प्रकार शांत झाले. यानंतर मुलाला त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात सोपवण्यात आले.