
झारखंडच्या रामगडमध्ये ड्रोन फार्मिंगचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता या तंत्रज्ञानामुळे शेतात औषध आणि खतफवारणी करणे सहज आणि सोपे होणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे (आयसीएआर) रामगडमध्ये याचे प्रात्यक्षिक यशस्वी केले आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा वेळ, औषधे आणि खत यांची बचत होणार आहे. त्यामुळे यासाठी होणारा खर्चही वाचणार आहे. झारखंडमध्ये चतरानंतर आता रामगडमध्ये ड्रोनद्वारे शेतीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवणे आणि खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना याची माहिती देण्यात आली. चेन्नईतील गरुडा एअरोस्पेस प्रायवेट लिमिटेडद्वारे हा प्रयोग करण्यात आला. शेतकऱ्यांना सामुहिकपणे या तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेत आणि खर्चात बचत करता येणार आहे.
या आधुनिक तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली, असे आयसीएआरचे प्रभारी कृषी वैज्ञानिकांनी सांगितले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार असून खर्चातही कपात होणार आहे. तसेच पीकावर येणाऱ्या रोगांमुळे होणारे नुकसानही टळणार आहे.
पीकावर अचानक रोग आल्यावर फवारणी करणे कठीण होते. तसेच एखादा शेतकरी फवारणी करु शकला नाही, तर त्याचे पिक नष्ट होते. या तंत्रज्ञानामुळे पीकांचे नुकसान टाळता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे एकाचवेळी शेकडो एकर शेतीवर फवारणी करता येणार आहे. त्यामुळे त्या भागातील सर्वच शेतात फवारणी होणार आहे. त्यामुळे पिकावरील रोग टाळता येणार आहेत. ड्रोनद्वारे दिवसाला 30 एकर शेतात फवारणी करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
इस्त्रायलमधून शेतीचे तंत्रज्ञान शिकून आलेल्या रचिया महतो यांनी सागितले की झारखंडमध्ये ड्रोनद्वारे शेतीचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. त्याचा वापर करून खर्च कमी होणार आहे. तसेच विक्रमी वेळेत फवारणी झाल्याने पिकावरील रोगाचे संकट टळणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहचण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

























































