शंभर गुन्हे दाखल करा, पण शाळांची अवस्था सुधारा; अभिजित दीपके यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामीण भागातील शाळांमधील मूलभूत सुविधांची दुरवस्था पाहता ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या गैरसोयी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे गुन्हा असेल, तर एक नाही, शंभर गुन्हे दाखल करा; पण शाळा दुरवस्था सुधारून विद्यार्थ्यांना सुविधा द्या, असा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिला.

कॉक्रोच पार्टीच्या स्कूल ठीक करो अभियानादरम्यान अभिजित दीपके यांनी शनिवारी हिंगोली तालुक्यातील लोहगाव आणि करंजाळा येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी लोहगावमधील एका शाळेत फेब्रुवारी महिन्यात मुदत संपलेले धान्य व मसाल्याची पाकिटे आढळून आली. वर्गखोल्या, विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था, स्वच्छतागृहाची पाहणी केली असता मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता आढळली. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याचे दिसून आले. फिल्टरही बंद असून पाण्याच्या टाकीतून दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत अभिजित दीपके यांनी शिक्षकांना धारेवर धरत जाब विचारला.

शाळेतील पाण्याच्या टाकीवर चढून पाहणी

लोहगाव शाळेत पिण्याच्या पाण्याची पाहणी करताना ग्रामस्थांनी, दीपके भेट देणार असल्यानेच जारचे शुद्ध पाणी आणण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर दीपके यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून पाहणी केली. टाकीतून दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले.