ख्वाजा, सीडल, लायन आले रे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, सिडनी

कसोटी मालिकेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने आगामी वन डे मालिकेसाठी आपली कंबर कसली असून अनुभवी खेळाडूंना संघामध्ये संधी देण्यात आली आहे. हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 12 जानेवारीपासून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी नॅथन लायन, पीटर सीडल व उस्मान ख्वाजा या अनुभवी खेळाडूंना कांगारूंच्या संघात संधी देण्यात आली आहे. ऍरोन फिंचकडे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून या संघात ट्रेव्हीस हेड, डार्सी शॉर्ट व ख्रिस लीन या खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. पीटर सीडल तब्बल आठ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघात खेळताना दिसणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा वन डे चमू -अॅरोन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅण्डस्कोम्ब, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरी, जे. रिचर्डसन, बिली स्टेनलेक, जेसन बेहरनडोर्फ, पीटर सीडल, नॅथन लायन, ऍडम झाम्पा.