पुलवामानंतर तैनात केली होती विमानवाहू विक्रमादित्य नौका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हिंदुस्थानने लष्कर आणि हवाई दलाबरोबरच नौदलालाही सज्ज ठेवले होते. त्यानुसार ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू नौकेबरोबरच आण्विक पाणबुडी आणि इतर 60 लढाऊ जहाजे तैनात ठेवल्याची माहिती समोर आली आहे.