
आयपीएलला 19 सप्टेंबरपासून यूएईत सुरुवात होणार आहे. याप्रसंगी जगभरातून उदंड प्रतिसाद लाभत असलेल्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱया फलंदाजांच्या यादीवर नजर टाकल्यास यामध्ये हिंदुस्थानी खेळाडूंचा दबदबा प्रकर्षाने दिसून येतो. हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने 5412 धावा तडकावताना या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. यादरम्यान त्याने पाच शतके तसेच 36 अर्धशतके झळकवली आहेत.
सर्वोत्तम दहामध्ये सात मायदेशाचे
सर्वाधिक धावा करणाऱया फलंदाजांच्या यादीतील दहापैकी सात खेळाडू मायदेशातील म्हणजेच हिंदुस्थानातील आहेत. यामध्ये विराट कोहलीसह सुरेश रैना, रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी, रॉबिन उथप्पा, गौतम गंभीर या फलंदाजांचा समावेश आहे. अजिंक्य रहाणे अकराव्या स्थानावर आहे. तसेच डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल व ए. बी. डिव्हिलियर्स या परदेशी खेळाडूंचा अव्वल दहाच्या यादीत समावेश आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज (सर्वोत्तम अकरा)
- विराट कोहली – 5412 धावा (पाच शतके, 36 अर्धशतके)
- सुरेश रैना – 5368 धावा (1 शतक, 38 अर्धशतके)
- रोहित शर्मा – 4898 धावा (1 शतक, 36 अर्धशतके)
- डेव्हिड वॉर्नर – 4706 धावा (4 शतके, 44 अर्धशतके)
- शिखर धवन – 4579 धावा (37 अर्धशतके)
- ख्रिस गेल – 4484 धावा (सहा शतके, 28 अर्धशतके)
- महेंद्रसिंग धोनी – 4432 धावा (23 अर्धशतके)
- रॉबिन उथप्पा – 4411 धावा (24 अर्धशतके)
- ए. बी. डिव्हिलियर्स – 4395 धावा (3 शतके, 33 अर्धशतके)
- गौतम गंभीर – 4217 धावा (36 अर्धशतके)
- अजिंक्य रहाणे – 3820 धावा (2 शतके, 22 अर्धशतके)



























































