हिंदुस्थानी वेटलिफ्टर्सची पॉवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । एपिया (समोआ)

हिंदुस्थानी वेटलिफ्टर्सची कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमधील पदकांची लयलूट बुधवारीही सुरूच राहिली. राखी हल्दर व देविंदर कौर यांनी यांनी महिलांच्या सीनियर गटात गोल्ड मेडल जिंकून आपली धमक दाखवली. सीनियर व ज्युनियर गटात मिळून सात सुवर्ण पदकांची कमाई हिंदुस्थानी खेळाडूंनी यावेळी केली. देविंदर कौर हिने 59 किलो वजनी गटात 184 किलो वजन उचलून तर राखी हल्दर हिने 64 किलो वजनी गटात 214 किलो वजन उचलून सुवर्ण पदकावर नाव कोरले.