हिंदुस्थानची उपांत्यपूर्व फेरीत धडक

इशारानी बरुआ व अनमोल खरब यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर हिंदुस्थानी महिला संघाने रविवारी उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. ‘अ’ गटातील दुसऱया लढतीत हिंदुस्थानी संघाने सिंगापूरचा 4-1 फरकाने पराभव केला. आशियाई विजेत्या हिंदुस्थानन स्टार खेळाडूंच्या गैरहजेरीत पॅनडाचा पराभव करीत शनिवारी आपल्या अभियानाचा विजयारंभ केला होता. आज सिंगापूरविरुद्ध पहिल्या लढतीत हिंदुस्थानच्या अश्मिता चालिहाचा पराभव झाला. तिला यिओ जिया मिनने 21-15, 21-18 असे हरविले. मग प्रिया काsंजेंगबाम व श्रुती मिश्रा या हिंदुस्थानी जोडीने पहिल्या महिला दुहेरीत जियाओ एन हेंग व जिन यु जिया या सिंगापूरच्या जोडीचा 21-15, 21-16 असा पराभव करीत बरोबरी साधली. त्यानंतर इशारानी हिने दुसऱया एकेरीत सिंगापूरच्या इनसिराह खानचा 21-13, 21-16 असा पराभव करीत हिंदुस्थानला 2-1 असे आघाडीवर नेले. मग सिमरन सिंधी व रितिका ठाकूर या हिंदुस्थानी जोडीने यी टिंग एल्सा व जान मिचेल या सिंगापूरच्या जोडीचा 21-8, 21-11 असा धुव्वा उडवला.