आता इंडस्इंड बँकेचं चाललंय काय? शेअर 38 टक्क्यांनी घटले, ठेवी कमी झाल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येस बँकेनंतर खासगी क्षेत्रातील इंडस्इंड बँकही अडचणीत आली आहे. इंडस्इंड बँकेचे शेअर सतत घसरत आहेत. गेल्या काही दिवसांत बँकेचे शेअर 38 टक्क्यांनी पडले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीचा विचार केला तर आतापर्यंत शेअर 56 टक्के खाली आले आहेत. शेअर मार्केट जाणकारांच्या मते येस बँकेमुळे इंडस्इंड बँकेवर ही वेळ आली आहे.

येत्या तीन महिन्यांत इंडस्इंड बँकेतील ठेवी घटू शकतील, असा अंदाज आहे. बँकेच्या एकूण ठेवींपैकी 40 टक्के हिस्सा अल्पमुदतीच्या ठेवींचा आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बँकेचे प्रमोटर हिंदुजा ग्रुपने रिझर्व्ह बँकेने आपली भागीदारी 26 टक्क्यांपर्यंत करण्याची मागणी केली आहे. सध्या प्रमोटरची भागीदारी 15 टक्के असण्याचा नियम आहे. हिंदुजा ग्रुपची भागीदारी वाढली की बँकेच्या गुंतवणूकदारांचा विश्वास वाढू शकतो.