इन्स्टाग्राम रील्स व्हिडीओ डाऊनलोड करा झटपट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात टिकटॉक बॅन झाल्यानंतर इन्स्टाग्रामच्या रील्स या शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढली आहे. रील्सचे काही व्हिडीओ आपल्याला आवडतात पण ते सेव्ह करू शकत नसल्याचे युजरची पंचाईत होते. मात्र सोपी ट्रिक वापरून रील्स व्हिडिओ कसे डाऊनलोड करायचे याची ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अॅन्ड्रॉईड युजरला सर्वात गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘व्हिडीओ डाऊनलोडर फॉर इन्स्टाग्राम’ हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. अॅप सुरु केल्यानंतर आयडी सेटअप करा, त्यानंतर आपल्याला आवडलेला व्हिडिओ निवडा. तीन डॉट आयकॉनवर टॅप करुन त्या व्हिडीओची लिंक कॉपी करा. व्हिडिओ डाऊनलोडर फॉर इंन्स्टाग्राम अॅप सुरु करुन कॉपी केलेली युआरएल आपोआप पेस्ट होईल. फोनच्या गॅलरीत तो व्हिडीओ सेव्ह होईल.