‘पीएफ’वर आता 8.25 टक्के व्याजदर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खात्यात जमा केलेल्या रकमेवर आता 8.25 टक्के व्याज दर मिळेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) पेंद्रीय विश्वस्त मंडळाने शनिवारी याची शिफारस केली. मंडळाने आज 235 व्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. शासनाच्या मान्यतेनंतर याची अंमलबजावणी केली जाईल. कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ही माहिती दिली. नवीन दर लागू झाल्यानंतर ईपीएफ खात्यात एक लाख रुपये जमा असल्यास खातेधारकांना प्रतिवर्ष 8 हजार 250 रुपये व्याज मिळू शकणार आहे. ईपीएफओने गेल्या वर्षी मार्चमध्ये 8.15 टक्के व्याजदर निश्चित केले होते. देशातील सहा कोटींहून अधिक कर्मचारी पीएफच्या कक्षेत येतात.