IPL 2020 – यूएईमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी सर्वात खराब, तर ‘या’ संघाने जिंकल्यात सर्वच्या सर्व मॅच

टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठी लीग सुरू होण्यास अवघा एक दिवस बाकी आहे. यंदा यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या 13 व्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर सर्वांची नजर असेल. आजपर्यंत मुंबईने आयपीएलमध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी करत चार वेळा विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे यंदाही मुंबईचा संघ विजेतेपदाचा दावेदार आहे, मात्र इतिहास पाहिला असता यूएईमध्ये रोहित शर्माच्या संघाची कामगिरी सर्वात खराब राहिली असल्याचे दिसते.

यूएईमध्ये आयपीएल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2014 च्या लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलच्या लीग मॅचेस यूएईत खेळल्या गेल्या होत्या. 6 वर्षांपूर्वी झालेल्या या स्पर्धेत यूएई झालेल्या लढतीत मुंबईने सर्वात खराब कामगिरी नोंदवली होती. मुंबईला यूएईच्या धरतीवर एकही सामना जिंकता आलेला नाही. 2014 ला मुंबईने सर्वच्या सर्व 5 लढती गमावल्या होत्या.

बीडच्या अंबाजोगाई येथील ‘कलाकार’ IPL गाजवण्यासाठी सज्ज, गतविजेत्या मुंबईच्या संघात समावेश

पंजाबची कामगिरी दमदार
दुसरीकडे आजपर्यंत एकही विजेतेपद जिंकू न शकलेल्या पंजाबला यूएईची हवा मानवत असल्याचे दिसते. 2014 ला यूएईमध्ये झालेल्या लढतीत सर्वात दमदार कामगिरी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने केली होती. पंजाबने येथे खेळलेल्या सर्व 5 लढतीत विजय मिळवला होता.

IPL 2020 – आयपीएलमधील ‘अविश्वसनीय’ झेल, खेळाडूंची चपळता पाहून व्हाल अवाक

अशी आहे सर्व संघाची कामगिरी

– किंग्ज इलेव्हन पंजाबने येथे 5 लढती खेळल्या आणि सर्वच्या सर्व जिंकल्या.

– चेन्नई सुपर किंग्जने 5 लढतीत 4 विजय मिळवला आणि 1 लढत गमावली.

– राजस्थान रॉयल्स येथे 5 लढती खेळला आणि 3 विजय तर मिळवला 2 पराभव स्वीकारले.

– कोलकाता नाईट रायडर्सने येथे 5 लढतीत 2 विजय आणि 3 पराभव बघितले.

– कोलकाताप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने देखील 5 लढतीत 2 विजय मिळवले आणि 3 लढतीत पराभव स्वीकारला.

– सनरायझर्स हैद्राबादच्या संघाने येथे 5 लढतीत 2 विजय मिळवले आणि 3 लढती गमावल्या.

– दिल्ली कॅपिटल्सने 5 लढतीत 2 विजय आणि 3 पराभव स्वीकारले.

– मुंबई इंडियन्सने सर्वच्या सर्व 5 लढतीत पराभव स्वीकारला.

IPL 2020 – किंग्ज इलेव्हन पंजाबला पहिल्या ‘टायटल’चे वेध, ही आहे जमेची बाजू

आपली प्रतिक्रिया द्या