खेळपट्टीमधील विविधतेमुळे रोमांच – महेला जयवर्धने

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कोरोनामुळे सहा स्थळांवरच लढतींचे आयोजन करण्यात येत आहे. याचमुळे सध्या मुंबई व चेन्नई या दोन ठिकाणांवर लढत खेळवण्यात येत आहेत. एकीकडे मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टीवर धावांच्या राशी उभारल्या जात आहेत. दुसरीकडे चेन्नईतील एम ए चिदमबरम स्टेडियममध्ये धावांसाठी फलंदाजांना कठीण परिश्रम घ्यावे लागत आहेत. यामुळे चेन्नईतील खेळपट्टीवर नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मुंबई इंडियन्सचे प्रमुख कोच महेला जयवर्धने याने चेन्नईतील खेळपट्टीची पाठराखण करताना म्हटले की, आयपीएलमधील लढती विविध ठिकाणांवर खेळवल्या जातात. खेळपट्टीमधील विविधतेमुळे रोमांच दिसून येतो.

महेला जयवर्धने पुढे म्हणाला, आयपीएलच्या लढती ज्या ठिकाणी खेळवण्यात येतात त्या स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना पोषक असायला हवी असे म्हणणे योग्य ठरणार नाही. प्रत्येक खेळपट्टी वेगळी असल्यामुळेच बॅट व चेंडूचा जबरदस्त खेळ पाहायला मिळत आहे. तसेच चेन्नईतील खेळपट्टीवर गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येत असले तरी 150 ते 160 धावा होताना दिसत आहेत, हेही विसरता कामा नये, असेही तो पुढे नमूद करतो.

आपली प्रतिक्रिया द्या