
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम लढतीत गुजरातला पराभवाच पाणी पाजत सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. गुजरातने दिलेल्या 150 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना RCB ने धडाकेबाज सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या वेंकटेश अय्यरने 16 चेंडूंमध्ये 32 धावा करत कडक सलामी दिली. दुसरीकडे विराट कोहलीने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत संघाला विजयाचा उंबरठा पार करून दिला. विराटने नाबाद 75 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. पहिल्या डावाचा विचार करता बंगळुरूच्या रसिक सलामने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 आणि कृणाल पंड्याने 1 विकेट घेतली.

























































