नागरिकत्व विधेयकाला विरोध करत आयपीएस अब्दुर रहमान यांचा राजीनामा

435

लोकसभेनंतर राज्यसभेत नागरिकत्व संशोधन विधेयकाला (कॅब) बुधवारी मंजुरी मिळाली. याच्या निषेधार्थ राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक अब्दुर रहमान यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांनी राजीनाम्याचे ट्विट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रहमान हे 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. राज्यसभेत कॅबला मंजुरी मिळाल्यानंतर रहमान यांनी तडकाफडकी राजीनाम्याचे ट्विट केले. राजीनाम्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. हे विधेयक हिंदुस्थानच्या धार्मिक एकतेविरोधात आहे. मी न्यायप्रेमी लोकांना विनंती करतो की, लोकशाही पद्धतीने या विधेयकास विरोध करा असे त्यांनी ट्विट केले.

आपली प्रतिक्रिया द्या