संतांच्या त्यागाने व त्यांनी मांडलेल्या विचाराने समाजात शांतता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

संतांच्या त्यागाने व त्यांनी मांडलेल्या विचाराने समाजात शांतता निर्माण प्रस्थापित झाली असल्याने प्रत्येकानेच संतांच्या विचारांचे अनुकरण करावे असे मत माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा यांनी व्यक्त केले.

शहरात नव्याने बांधलेल्या जैन धर्मियांच्या स्थानकाचे उदघाटन करण्यात आले. या वेळी जैन साध्वी प्रतिभा कवरजी, सिद्धी सुधाजी, सुविधीजी, समितीजी महाराज, हंत माधव बाबा, सतीश गुगळे, आनंदकुमार चोरडिया, सुभाष चोरडिया व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

या वेळी बोलताना पोखरणा म्हणाले की, जैन हा असा एकमेव धर्म आहे ज्या धर्मात धार्मिकतेवर व साधू साध्वींवर खर्च केला जात नाही. प्रत्येकाने दैनंदिन जीवनात काही काळ आपल्या धर्मासाठी वेळ काढणे गरजेचे आहे. या ठिकाणी जी अद्यावत इमारत बांधण्यात आली आहे त्या इमारती मधून संस्कार व शांततेचा संदेश सर्वत्र गेला पाहिजे. प्रास्ताविक जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चोरडिया, सूत्रसंचालन सुरेश गुगळे तर आभार श्रेयस चोरडिया यांनी मानले.