जालना – शिवसेनेच्या आंदोलनाचा धसका, आंदोलन सुरु होताच अर्ध्या तासात शेतातील वीज पुरवठा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारधसह परिसतील वीज तोडून महावितरणने आडमुठे धोरण अवलंबविले होते. त्या विरूद्ध 1 डिसेंबर रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुलढाणा ते भोकरदन रोडवर पारध बसस्थानकावर सकाळी 10 वाजता रास्ता रोको करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आवमान करणार्‍या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे सुधांशू त्रिवेदी याचा निषेध करून त्यांच्या विरूद्ध घोषणा देण्यात आल्या. शिवसेनेच्या आंदोलनाला अर्धा तासही नाही होत तर वीज कंपनीच्या अधिकारी यांनी शेतकर्‍यांची तोडलेली वीज सुरू करून वीज बील भरण्यासाठी आठ दिवसाची मुदत देऊन पाच हजारांऐवजी तीन हजार रुपये भरण्यास सांगितले आणि वीज पुरवठा सुरळीत केला.

या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी केले. यावेळी पारध पोलिस ठाण्याचे पो.हे.काँ प्रकाश शिनकर, गोपीनीय शाखेचे सुरेश पडोळ यांनी बंदोबस्त ठेवला होता. या रास्ता रोकोमध्ये शेकडो शेतकर्‍यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य व शिवसैनिकांची उपस्थिती होती.