
सामना ऑनलाईन । जम्मू
पुलवामा हल्ल्यानंतर सरकारने जम्मू कश्मीरमधील जमात ए इस्लामी या संघटनेवर देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप ठेवत बंदी घातली आहे. या बंदीला जम्मू कश्मीरमधील अनेक नेत्यांनी विरोध केला आहे. मात्र जमात-ए-इस्लामी या संघटनेचे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रण आयएसआय व दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याचे समोर आले आहे. आयएसआयच्या मदतीने जमात-ए-इस्लाम ही संघटना कश्मीरातील तरुणांना शस्त्रास्त्रे पुरवत असल्याचे देखील समोर आले आहे.
पाकिस्तानातील आयएसआय ही कश्मीरातील तरुणांचे ब्रेन वॉश करण्यासाठी, शस्त्र वापरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी जमात ए इस्लामीचा वापर केला जात होत. जमात ए इस्लामी मधील नेते हे पाकिस्तानच्या उच्चायुक्तांशी सतत संपर्कात असायचे. तसेच हिजबुलच्या दहशतवाद्यांना देखील या संघटनेचा पाठिंबा असायचा असे समोर आले आहे. त्यामुळेच सरकारने या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
























































