बूम-बूम बुमराहची कमाल; मेडनचा विक्रम, विकेट घेण्यातही सर्वात पुढे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jasprit-bumrah

T20 WC टी- 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सूर उशिरा गवसला. पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत टीम इंडियाचा परफॉर्मन्स चांगलाच सुधारला आहे. शुक्रवारी स्कॉटलंड विरुद्ध खेळताना टीम इंडियाकडून गोलंदाजांनी कमाल केली. 100 च्या आत स्कॉटलंडला रोखण्यात त्यांना यश आलं. यामध्ये जसप्रीत बुमराह यांनी शुक्रवारी दोन विकेट घेतल्या, त्यासोबत टी-20 मध्ये हिंदुस्थानचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे.

जसप्रीत बुमराहच्या नावावर आता टी-20 (आंतरराष्ट्रीय) मध्ये 64 विकेट आहेत, जे कोणत्याही हिंदुस्थानी गोलंदाजापेक्षा अधिक आहेत. शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या या सामन्यात जसप्रीत बुमराहने युजवेंद्र चहल याला पाठी सोडलं.

टी-20 (आंतरराष्ट्रीय) मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे इंडियन बॉलर

जसप्रीत बुमराह – 64
युजवेंद्र चहल – 63
रविचंद्रन अश्विन – 55
भुवनेश्वर कुमार – 50
रवींद्र जडेजा – 43

एवढंच नाही तर जसप्रीत बुमराहने स्कॉटलंड विरुद्ध खेळताना बुमराहने 3.4 षटकात 10 धावा देत 2 विकेट घेतल्या आणि एक निर्धाव षटकही फेकलं. जसप्रीत बुमराहने स्कॉटलंडचा कर्णधार के. कोएत्जर आणि मार्क वॉट यांना त्रिफळाचित केलं.