
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू आणि जगविख्यात खेळाडू शेन वॉर्न पुन्हा एकदा वादात सापडला आहे. मॉडेल आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जेसिका पावर हिने त्याच्यावर अश्लिल मेसेज पाठवल्याचा आरोप केला आहे. जेसिका हिने वॉर्नने पाठवलेल्या मेसेजचे स्क्रिनशॉटही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
जेसिकाने शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये वॉर्नने तिला सेक्ससाठी हॉटेलच्या एका खोलीमध्ये भेटण्याची गळही घातल्याचे दिसत आहे. वॉर्नच्या या मागणीला जेसिकाने नकार दिला. यानंतरही वॉर्नने तिला अनेक मेसेज पाठवल्याचे स्क्रिनशॉटमध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे असा आरोप होण्याची ही वॉर्नची पहिलीच वेळ नाही. अफेअर आणि सेक्स स्कँडल यामध्ये अडकल्याने याआधी त्याचे लग्नही मोडले आहे.
30 वर्षीय जेसिका हिने इंग्लिश रिएलीटी शो बिग ब्रदर व्हीआयपीमध्ये बोलताना सांगितले की, शेन वॉर्न याने आपल्याला अनेकदा मेसेज केले. तो मला हॉटेलमध्ये बोलावत होता. मात्र आपण त्याला स्पष्टपणे नकार दिला आणि मी तशी मुलगी नसल्याचे सांगितले.. मात्र त्यानंतरही तो मेसेज करत होता आणि भेटण्याची गळ घालत होता. यामुळे आपण त्याचा नंबरही ब्लॉक केल्याचे जेसिकाने म्हटले.
View this post on Instagram
जेसिकाआधी ऑस्ट्रेलियाची मॉडेल एली गॉन्साल्वीस हिने देखील शेन वॉर्न याच्यावर आरोप केले होते. शेन वॉर्न याने आपल्याला भेटण्यासाठी बोलावले होते, असे तिने म्हटले. मात्र त्यावेळी माझ्याकडे वेळ नव्हता आणि मी 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे, असे तिने म्हटले होते.
View this post on Instagram
1000 आंतरराष्ट्रीय बळी
फिरकीपटू शेन वॉर्न याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 बळी घेतलेले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 708 आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये 293 बळींची नोंद आहे.




























































