दिल्लीतील बुराडीनंतर झारखंड मध्ये एकाच कुटुंबातील सहाजणांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, हजारीबाग

दिल्लीतील बुराडीमध्ये एकाच कुटुंबातील ११ जणांनी केलेल्या आत्महत्येचे गूढ उकलले नसतानाच झारखंडमधील हजारीबागमध्ये एकाच कुटुंबातील सहाजणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट आढळली असून गणिताच्या सूत्राप्रमाणे आत्महत्येचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यात म्हटले आहे. पोलीस या घटनेचा विविध पैलूंनी तपास करीत आहेत.

पतीपत्नी, त्यांचा मुलगा आणि सून तसेच नात आणि नाती या एकाच कुटुंबातील सहाजणांनी आत्महत्या केली. त्यातील पाचजणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली तर एकाने पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. मृतांमध्ये महावीर महेश्वरी (७०), त्यांची पत्नी किरण महेश्वरी (६५), मुलगा नरेश (४०), त्याची पत्नी प्रीती (३७), त्यांची मुले अमन (११) आणि यान्वी (६) यांचा समावेश आहे. घटनास्थळी तीन सुसाईड नोट आणि एक पॉवर ऑफ ऍटर्नी आढळली आहे. महावीर आणि किरण यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत, प्रीतीचा मृतदेह पलंगावर, यान्वीचा मृतदेह सोफ्यावर तर अमनचा गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. समोरच्या इमारतीसमोर नरेशचा मतदेह आढळला आहे. त्याने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

गणिताच्या सूत्रामध्ये सुसाइड नोट

महावीर यांचे ड्रायफ्रूटचे हॉलसेलचे दुकान आहे. सध्या ते कर्जबाजारीपणामुळे त्रासले होते. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटनुसार कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे उघड होत आहे. त्यांनी गणिताच्या सूत्राप्रमाणे सुसाईड नोट लिहिली आहे. बिमारी औ दुकान बंद औ दुकानदारों का बकाया न देना औ बदनामी औ कर्ज ङ तणाव ड मृत्यू अशाप्रकारे त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात अमनला फासावर लटकवू शकत नसल्याने त्याची हत्या केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.