
इराणने आपल्या महिला राष्ट्रीय फुटबॉल संघातून गोलरक्षक म्हणून एका पुरुषाला खेळवल्याचा गंभीर आरोप होत आहे. इराणविरोधात सामना खेळणाऱया जॉर्डनने हा आरोप केला आहे. आता या प्रकरणामध्ये जॉर्डन फुटबॉल असोसिएशनने आशियाई फुटबॉल समितीकडे (एएफसी) इराणच्या संघातील खेळाडूंची लिंगचाचणी आणि डोपिंग चाचणी करण्याची मागणी केलीय. यासंदर्भात जॉर्डनने एक पत्रही एएफसीला पाठवलं आहे. 25 सप्टेंबर रोजी इराण आणि जॉर्डनदरम्यान महिला आशिया कप पात्रता फेरीच्या सामन्यात हा गैर प्रकार झाल्याचा आरोप आहे.




























































