कांतारा प्रीक्वेलचे पोस्टर बनवायला लागले 10 दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षी कांतारा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता या चित्रपटाचा प्रीक्वेल लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. कांतारा 2 चे बजेट या प्रीक्वेलचे पोस्टर रिलीज झाले असून ऋषभ शेट्टीचा फर्स्ट लूक रिवील करण्यात आला आहे. कांताराचा येणारा भाग प्रीक्वल म्हणून सादर करण्यात येणार आहे.

निर्मात्यांनी रिलीज केलेल्या या पोस्टरमध्ये ऋषभ शेट्टी भगवान परशुराम अवतारात दिसत आहे. ऋषभच्या हातात भगवान परशुरामांचे शस्त्र परशु तर एका हातात त्रिशुळ दिसत आहे. चित्रपटाचे निर्माता विजय किरगांडूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणाची स्थापना केव्हा व कशी झाली. तसचे त्याचा निर्माता कोण होता यावर चित्रपटाची कथा असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. चित्रपटाचा पोस्टर बनवण्यास 10 दिवस लागले आहेत.

कांतारा हा गेल्या वर्षीचा सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट ठरला आहे. त्यामुळे कांताराच्या प्रीक्वेलसाठी लोकांच्या आशा वाढल्या आहेत. चित्रपटाचा प्रीक्वेल कन्नड, हिंदी, तेलुगू, तमीळ, मल्याळम, बंगाली अशा सहा भाषांमध्ये रिलीज होणार आहे.