कर्जत नगरपालिका निवडणूक : शिवसेनेकडून बारा उमेदवारांचे अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
voting

सामना प्रतिनिधी । कर्जत

कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या छानणीमध्ये कोणाचाही उमेदवारी अर्ज बाद झाला नसल्याने सर्वच पक्षाने उमेदवार जवळजवळ निश्चित झाले असल्याचे चित्र आहे. शिवसेनेकडून बारा, राष्ट्रवादीकडून अठरा, भाजपकडून सहा, काँग्रेसकडून चार, शेकापकडून तीन, मनसेकडून दोन, भारिपकडून दोन तर पाच अपेक्षांचे उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत. भाजपने प्रभाग क्रमक आठमधून छानणीच्या वेळी आपल्या मुख्य उमेदवारांच्या ऐवजी ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराला एबी फॉर्म जोडला.

कर्जत नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने आपली कंबर कसली असून आज छानणीच्या वेळी बहुतेक सर्वच उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत. शिवसेना आणि भाजप यांची या निवडणुकीसाठी युती झाले असून शिवसेना बारा तर भाजप सहा जागांवर निवडणूक लढत आहे. शिवसेनेमधून अरुणा वायकर,नितीन सावंत, यमुताई विचारे या विद्यमान नागरसेवकांना परत संधी देण्यात आली आहे.