Video – करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिर शिखरांवर काकडा प्रज्वलित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धार्मिक परंपरेनुसार दीपावलीच्या अमावस्येपासून करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित करण्यास सुरुवात झाली. येत्या कार्तिकेय पौर्णिमे पर्यंत पंधरा दिवस मध्यरात्री दोनच्या सुमारास मुख्य शिखरावर हा मशालीद्वारे वैशिष्ट्यपूर्णरित्या काकडा प्रज्वलित केला जातो.

अश्विन कृष्ण चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीत श्रीअंबाबाई मंदिरात नित्योपचारात बदल होतो.मंदिरातील मुख्य शिखरावर 15 दिवस मध्यरात्री दोन वाजता काकडा कापूर लावून प्रज्वलित केला जातो. चतुर्दशी दिवशी पहाटे २ वाजता मशालीने काकडा प्रज्वलित करण्यात येतो. यावेळी मंदिराच्या घाटी दरवाजा वरील घंटेचा नाद चालू असतो.

मंदिराच्या मुख्य शिखरांसह पाचही शिखरांना कापूर प्रज्वलित करून, मंदिर परिसरातील सर्व देवी देवता समोरही कापूर प्रज्वलित केला जातो. त्यानंतर देवीच्या गाभाऱ्यातील पितळी उंबर्‍यावर कापूर लावून मंदिराचा दरवाजा उघडून, त्यानंतर गाभार्‍याचा दरवाजा उघडला जातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

नित्योपचार होऊन देवीची काकड आरती होते. इतर वेळी रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी होणारी शेजारती 9 वाजून 40 मिनिटांनी होते. तसेच इतर वेळी 10 वाजून 30 होणारा गाभार्‍याचा बंद दरवाजा, रात्री 10 वाजताच बंद होतो. या पंधरा दिवसात सकाळी ९9 वाजून 30 मिनिटाला होणारी आरती 6 वाजून 30 मिनिटाला होते

.शिवाय या पंधरा दिवसात रात्री होणारा पालखी परिक्रमा सोहळा 8 वाजून 45 मिनिटांनी होतो. त्यानंतर दर शुक्रवारी होणारी पालखी परिक्रमा माघ सप्तमी अर्थात रथसप्तमी पर्यंत रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी होते. कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो‌. त्यानंतर काकडा सोहळा समाप्त होतो.