सामना ऑनलाईन, मुंबई
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ चित्रपटाच्या टीझर,ट्रेलरने संपूर्ण हिंदुस्थानात या चित्रपटाबद्दल जबर उत्सुकता निर्माण झाली आहे. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणापा हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाहीये. प्रदर्शनापूर्वीच ‘ठाकरे’ गगनभरारीसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची इतकी जबरदस्त क्रेझ निर्माण झाली आहे की मकरसंक्रांतीसाठी बाजारात आलेल्या पतंगांवरही या चित्रपटाचे नाव झळकले आहे. या पतंगांचे फोटो सध्या सोशल मीडिआवरवर व्हायरल झाले असून भगव्या रंगाचा या पतंगांवर ‘ठाकरे’ या शब्दांसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख म्हणजेच 25 जानेवारी 2019 लिहलेली बघायला मिळतेय.





























































