कोपरगाव – धोत्रे परिसरात दोन ते अडीच तास ढगफुटी सदृश्य पाऊस

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे परिसरात बुधवारी तीन ते साडेपाच वाजे दरम्यान ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतात पाणीच पाणी होऊन शेतकऱ्यांनी पेरलेली पिके पूर्णतः वाया गेली आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पडलेल्या पावसाचं पाणी 25 ते 50 घरात पाणी शिरले आहे.

समृद्धी महामार्गावरील सर्व पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने जनावरांसह नागरिकांचे त्यामुळे मोठे हाल झाले आहेत. पेरणी केलेली सोयाबीन, मका आदी पिकांचे बी वाहून गेले आहे. धोत्रे परिसरातील खळवाडी भागात 25 ते 50 घरात पाणी शिरल्याचे सामाजिक कार्यकर्ते मनसे तालुका उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितले. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे, त्या भागातील ओढे नाले खळखळून वाहू लागले आहेत.