
दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनात झालेला लाठीचार्ज, पेलेट गनचा वापर आणि राम मंदिरातील देणगी चोरीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यातही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले असून बुधवारी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सराकरविरोत संसद परिसरामध्ये मोर्चा काढला.
संसद परिसरातील प्रेरणा स्थळावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून मकर दारापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडातील पक्षाचे खासदार सहभागी झाले. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले?” असा थेट सवाल राहुल गांधी यांनी केला. या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत येऊन स्वतः उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.
अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या देणगीत झालेल्या गैरव्यवहाराचा मुद्दाही संसदेच्या दोन्ही सभागृहात गाजत आहे. राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि केंद्र सरकारकडे याप्रकरणी ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी केली. यावेळी विरोधकांनी “चंदा चोर कहां मिलेंगे – BJP के दफ्तर में!” अशा घोषणा देत संसद परिसर परिसर दणाणून सोडला.

लहान मुलांवर पॅलेट गन आणि AK-47 मधून गोळीबार करण्याचे आदेश का देण्यात आले? अमित शहा यांना याचे उत्तर द्यावेच लागेल. पावसाळी अधिवेशनाला 13 दिवस उलटून गेले तरी अमित शहा सभागृहात का येत नाहीत? त्यांना एवढी भीती कशाची वाटत आहे? असा सवालही यावेळी करण्यात आला.

मोदी सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही; नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सभागृहात येऊन उत्तर द्यावेच लागेल, ही मागणीही विरोधकांनी रेटून धरली.
चंदा चोर कहां मिलेंगे – BJP के दफ्तर में! संसद परिसरात विरोधकांचा मोर्चा; जंतरमंतरवरील लाठीचार्ज, राम मंदिर देणगी चोरीवरून निशाणा pic.twitter.com/pV3LXa4dgj
— Saamana Online (@SaamanaOnline) August 5, 2026




























































