लातूर – देशी कट्टा बाळगणाऱ्या युवकास अटक

4373

शहरात दोन महिण्यांपासून स्वतःजवळ देशीकट्टा बाळगणाऱ्या युवकास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने अटक केली आहे. त्याकडून एक देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मंठाळेनगर भागात राहणारा पृथ्वीराज उर्फ अण्णा भास्कर माने हा मागील दोन महिण्यांपासून स्वतःजवळ देशी कट्टा बाळगत होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.एस.नवले यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून एक्टीव्हा स्कुटीवरुन जात असताना पृथ्वीराज उर्फ अण्णा भास्कर माने यास रंगेहात पकडले. त्याच्या कडून एक देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतूसे (किंमत 42 हजार रुपये) जप्त करण्यात आले आहेत. शहरात घातपात करण्याच्या उद्देशाने त्याने गावठी कट्टा आणलेला होता त्याच्या विरुध्द गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या