लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार

लातूर जिल्ह्यात आज नवीन 71 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले, तर उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येने 20 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर मृतांची संख्या 600 वर पोहोचलेली आहे.

लातूर जिल्ह्यात आज 97 आरपीसीआर टेस्ट करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये 21 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. तर 436 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या असून, त्यामध्ये 50 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत.

जिल्ह्यामध्ये आजपर्यंत आरपीसीआर टेस्ट 36,223 करण्यात आलेल्या असून त्यामध्ये 6,915 जणांना कोरोनाची बाधा असल्याचे निदर्शनास आले. तर 73,856 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आलेल्या असून त्यामध्ये 13,155 जणांना कोरोनाची बाधा असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

मोठी बातमी – ‘अनलॉक-5’ची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवली, कंटेंनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन राहणार सुरूच

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 हजार 70 झालेली आहे. सध्या 819 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये 496 रुग्ण घरातच विलीगीकरणात उपचार घेत आहेत.

दिलासादायक, राज्यात कोरोना चाचणी आणखी स्वस्त

जिल्ह्यात आज उपचारादरम्यान 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 600 वर पोहोचली आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 18,651 एवढी आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे 93.92 टक्के असून आज 123 रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतलेले आहेत. तसेच जिल्ह्यात मृत्यू दर 2.9 टक्के आहे.

आपली प्रतिक्रिया द्या