लोकसभा ,विधानसभा निवडणूक सर्वांनी गांभीर्याने घ्यावी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

शिवसेनेने लोकसभा, विधानसभा निवडणूक गांभीर्याने घेतलेली आहे. त्यामुळे सर्वांनी गांभीर्याने काम करावे. ८० टक्के समाजकारण करा, एकञीत रहा. पक्ष, संघटना वाढीसाठी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन जिल्हासंपर्क प्रमुख संजय मोरे यांनी केले.

लातूर शहरविधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख शामराव पाचंगे, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक , विष्णू साबदे, शंकर रांजणकर, रमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी की सांगितले , सर्वांनी निवडणूक गांभीर्याने घ्यावी. काम न करणाऱ्या पदाधिकारी यांची गय केली जाणार नाही. शिवसैनिक म्हणून आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लाऊन काम करणार. हेवे दावे संपवा, एकत्रित ताकद निर्माण करा. संघटना वाढीसाठी सर्वांनी योगदान द्यावे. वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष संघटनेचा वापर करू नका. पक्षाशी गद्दारी करु नका. प्रामाणिकपणे काम करा, यश निश्चित मिळेल असेही ते यावेळी म्हणाले.