मोबाईल चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले, 5 जणांना अटक

कमी किंमतीत चोरलेले मोबाईल विक्री करण्यात येत असल्याची माहिती लातूर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 34 मोबाईल जप्त करण्यात आले. 4 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे गांधीचौक हद्दी मधून मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. तसेच इतर पोलीस स्टेशनला देखील मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केला जात होता. मोबाईल चोरी करणारे व ते मोबाईल कमी किमतीत लोकांना विकणाऱ्या एका टोळीचा शोध पोलिसांनी लावला होता. या टोळीला पोलिसांनी अटक केली. यामध्ये आसिफ सत्तार सय्यद वय ,24 वर्ष, जब्बार सत्तार सय्यद, वय 28 वर्ष, बाबा सतार सय्यद, वय 21 वर्ष, सर्व राहणार लालबहादूर शास्त्री नगर लातूर. मुस्तफा सतारमिया शेख, व 29 वर्ष, राहणार बरकत नगर लातूर सध्या राहणार करीमनगर, गरुड चौक लातूर. मोहम्मद रिजवानुल हक अब्दुल रजाक गवंडी, वय 30 वर्ष, राहणार दत्तनगर निलंगा. यांचा समावेश होता. त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.त्यांनी चोरलेला मुद्देमाल विविध कंपनीचे 34 मोबाईल एकूण 4 लाख 21 हजार रुपयाचा मुद्देमाल हजर केला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे राजेश कंचे, मोहन सुरवसे, नितीन कठारे, राहुल कांबळे, मनोज खोसे प्रदीप चोपणे, सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती नलिनी गावडे पोलीस अमलदार संतोष देवडे, शैलेश सुडे यांनी केली आहे.