मेहुण्याने केला भाऊजीचा खून

964
crime-spot

निलंगा तालुक्यातील नदीहत्तरगा येथे मेहुण्याने भाउजीची लोखंडी कत्तीने गळ्यावर मारून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिनकर उर्फ दिनेश देवीदास तिप्पनबोणे या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत रमेश मरोती कोळी यांनी दिनकर याला ‘तू व तुझी पत्नी माझ्या आई वडीलकडून पैसे का नेता’ शिवीगाळ केली होती. यानंतर मयत रमेशने दिनकर याला दोन चापटीही लगावली होती. याचाच राग मनात ठेवून दिनकरने शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास नदीहत्तरगा येथे रमेश कोळी यांना हातातील लोखंडी कत्तीने गळ्यावर मारून गंभीर जखमी करून खून केला. यानंतर दिनकरने रमेश यांचा मुलगा राहुल कोळी यालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी राहुल कोटी याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या