विधी अभ्यासक्रम परीक्षेबाबत विद्यार्थी अजूनही संभ्रमातच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
law

सामना ऑनलाईन,मुंबई

विधी अभ्यासक्रमाच्या 60-40 पॅटर्नला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना विद्यापीठाने मात्र अद्याप याबाबत स्पष्ट निर्देश दिले नसल्याने विद्यार्थी परीक्षा कशी होणार या संभ्रमात आहेत. त्यामुळे विद्यापीठाने याबाबत लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.

मुंबई विद्यापीठाने अचानक शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर विधी अभ्यासक्रमासाठी  60-40 पॅटर्न लागू केल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडला. या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी हा पॅटर्न लागू करू नका, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी त्यासंदर्भातील विद्यापीठाने त्यानंतर कशा परीक्षा होणार हे स्पष्ट ने केल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.

परीक्षेचा अभ्यास कसा करणार!

विद्यापीठाने विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी आणखी वेळ लागणार आहे. मात्र नव्याने होणाऱ्या परीक्षा या किती गुणाच्या असतील आणि गुणांचा पॅटर्न कसा असेल याबाबत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने याबाबत तातडीने निर्णय जाहीर करावा अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली आहे.