रत्नागिरीत बिबट्याची दहशत; हल्ल्यात तीनजण जखमी

611
leopard

रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी बेहेरे टप्पा येथे सोमवारी रात्री बिबट्याने तिघांवर हल्ला केला. सोमवारी रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हे हल्ले केले आहेत. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. सोमवारी रात्री बेहेरे टप्पा येथे मेर्वी येथून अजय अरुण थुळ माळुंगे येथे जात असताना त्यांच्यावर बिबटयाने हल्ला करून त्यांना जखमी केले. रत्नागिरीतून गावखडीकडे जाणाऱ्या पेजे यांच्यावर यांच्या दुचाकीस्वार हल्ला करून त्यांनाही बिबट्याने जखमी केले. तसेच मेर्वी येथील पायल खर्डे या पावसहून घरी जात असताना त्यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केल्याने त्या जखमी झाल्या आहेत. बिबट्याने सुमारे एका तासात तिघांवर हल्ला केल्याने ग्रामस्थांनमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

काही दिवसांपूर्वी बिबट्याने याच परिसरात 5 सप्टेंबर रोजी सकाळी एका शेतकऱ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. वन विभागाने घटनेची दखल घेतली आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मुंबई व पुण्याहून पथक दाखल झाले. सहा दिवसांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जरबंद करण्यात पथकाला यश आले नाही. कॅमेरा आणि पिंजरा लावूनही बिबट्याचा माग लागला नाही. त्यामुळे पथके माघारी फिरले. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या