अननस खा आणि ‘हे’ 10 फायदे मिळवा !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निरोगी आरोग्यासाठी आहारात फळांचा समावेश करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात बोरं, पेरू, संत्र इत्यादी फळं बाजारात आवर्जन येतात. काही जणं केळ, सफरंचंद आवर्जून खातात. बऱ्याच जणांच्या आहारात अननसाचा समावेश असतोच, असे नाही. अननसामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक घटक आहेत त्याचा शरीराला अतिशय चांगला फायदा होतो. त्यामुळे हे फळ आवर्जून खावेच. अननस हिवाळ्यात खावे का, ते नेमके कधी आणि किती वाजता खावे, जाणून घेऊया अननसाचे गुणधर्म आणि ते कोणत्या वेळी खावे, याविषयी…

अननसामध्ये अँटीऑक्सिडंटस, अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटी कॅन्सर गुणधर्म असल्याने या फळाचे आयुर्वेदात बरेच महत्त्व सांगितले आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असल्याने कोलेजन निर्मितीसाठी म्हणजेच त्वचा आणि केस चांगले राहण्यासाठी याचा उपयोग होतो. अननसाची चव – गोड आणि आंबट असते, ते पचायला थोड जड असून शीत प्रकृतीचे असते. शरीरातील वात-पित्त कमी करण्यासाठी अननस अतिशय फायदेशीर आहे.

स्नॅक वेळेनुसार, म्हणजेच सकाळी १० ते 11च्या दरम्यान किंवा सायंकाळी 4 ते 6च्या दरम्यान अननस खाऊ शकतो. अननस खाल्ल्याने किडनी स्टोन, हृदयरोग, रक्तदाब, जंत, पाळीच्या तक्रारी, बद्धकोष्ठता, कावीळ, हाडांच्या तक्रारी, कोलेस्टेरॉल आणि शारीरिक जखम भरण्यासाठी अननस खाल्ल्याने फायदा होतो.