थंडीच्या दिवसात प्या ‘हे’ पाणी; संसर्गजन्य आजारांपासून दूर राहाल, जाणून घ्या कृती

 रोगप्रतिकारक्षमता कमी असलेल्या लोकांना इतरांपासून संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. हिवाळ्यात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. सर्दी, पडसे आणि ताप आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आल्याने किंवा तिच्या शिंकण्याने-खोकल्याने तासाभरातच तुम्हालासुद्धा त्या व्यक्तिसारखीच लक्षणे सुरू होतात. अंगही दुखू लागते. अशा प्रकारचा त्रास तुम्हाला होत असेल तर हे घसा खूप सेंसेटिव्ह असल्याचे आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याचे लक्षण आहे. अशा वेळी हिवाळ्यात संसर्गजन्य आजार होऊ नयेत, म्हणून तयार केलेले पाणी (Winter special water) प्यायल्यास या दिवसांत होणाऱ्या आजारांपासून दूर राहता येऊ शकते.

कसे तयार कराल Winter special water?

थंडीच्या दिवसांत तंदुरुस्त राहण्यासाठी जे पाणी तयार करायचे आहे, त्याकरिता 4 पदार्थांचा आवश्यकता आहे.

साहित्य

1 लिटर पाणी, 4 ते 5 काळ्या मनुका, अर्धा चमचा सुंठ पावडर, 1 हिरवी वेलची

कृती

  • सर्वप्रथम एका पातेल्यात 1 लिटर पाणी घ्या. गॅसवर गरम करण्याकरिता ठेवा. पाणी व्यवस्थित उकळल्यावर त्यात मनुका घाला. हिरवी वेलची कुटून घाला. त्यानंतर अर्धा चमचा सुंठ पावडर घाला.
  • आता हे 1 लिटर पाणी 750 मिली. होईपर्यंत उकळा.
  • त्यानंतर पातेले गॅसवरून उतरवा. आता हे पाणी कोमट होऊ द्या. कोमट झाल्यावर गाळून बाटलीत भरा. दिवसभरात जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा हेच पाणी प्या.
  • मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी पाण्यात मनुका घालू नयेत. त्याऐवजी फक्त हिरवी वेलची आणि सुंठ पाण्यात घालावी.

पाण्याचे फायदे

  • छातीत जळजळ, एसिडिटी असे त्रास असलेल्या व्यक्तीसुद्धा या पाण्याचे सेवन करू शकतात. यामुळे इतर शारीरिक फायद्यांसह जळजळ कमी होण्यास मदत होते.
  • वारंवार तहान लागते, घशाला कोरड पडते आणि पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच युरिनचे प्रेशर येते, असे त्रास होणाऱ्या व्यक्तिंसाठी हे पाणी गुणकारी आहे. यामुळे घशाला कोरड पडण्याचा त्रास दूर होतो. लघवीच्या समस्यांवर आराम मिळतो.
  • अपचन, गॅस, पोट फुगी यासारखे आजार हिवाळ्यात होतात, कारण बरेच लोक या दिवसांत शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहू शकत नाहीत. या समस्यांपासून सुटका होण्याकरिता हे पाणी पिणे फायदेशीर ठरते.