
सामना ऑनलाईन । मुंबई
नरेंद्र पाटील हे भाजपमध्ये आहेत. ते आज माझी भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर आले आहेत. या भेटीचा अर्थाचा अनर्थ होऊ नये. या भेटीतून कोणताही राजकीय अर्थ काढू नका असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
भाजपचे नेते नरेंद्र पाटील आज दुपारी ‘मातोश्री’ पोहोचले. त्यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र या भेटीचा अर्थचा अनर्थ करू नका असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. नरेंद्र पाटील यांच्या संदर्भातील चर्चा मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी मिळून करू. त्यासंदर्भातील निर्णय रविवारी तुम्हाला कळेलच, असेही ते म्हणाले.





























































