Lok sabha 2019 निवडणुकीचा बिगुल वाजला, 7 टप्प्यात होणार मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा (Lok sabha 2019) निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे. राजधानी दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये ही पत्रकार परिषद होत असून या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकांची घोषणा झाल्याने आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

वाचा पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –

  • 29 एप्रिलला महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान
  • 23 एप्रिलला महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान
  • 18 एप्रिलला महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान
  • 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान
  • महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार
  • शेवटच्या टप्प्यात 8 राज्यात 59 जागांसाठी मतदान
  • सहाव्या टप्प्यात 7 राज्यात 59 लोकसभा जागांसाठी मतदान
  • पाचव्या टप्प्यात 7 राज्यात 51 लोकसभा जागांसाठी मतदान
  • चौथ्या टप्प्यात 9 राज्यात 71 लोकसभा जागांसाठी मतदान
  • तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यात 115 लोकसभा जागांसाठी मतदान
  • दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यात 97 लोकसभा जागांसाठी मतदान
  • पहिल्या टप्प्यात 20 राज्यात 91 लोकसभा जागांसाठी मतदान
  • बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान
  • 19 मे सातव्या टप्प्यातील मतदान
  • 12 मे सहाव्या टप्प्यातील मतदान
  • 6 मे पाचव्या टप्प्यातील मतदान
  • 29 एप्रिल चौथ्या टप्प्यातील मतदान
  • 23 एप्रिल तिसऱ्या टप्प्यातील मतदान
  • 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान
  • 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान

  • 23 मे रोजी होणार मतमोजणी
  • लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर, सात टप्प्यात होणार निवडणूक

  • पेड न्यूजवर कठोर कारवाई करणार – निवडणूक आयोग
  • मतदानाच्या 48 तास आधी ध्वनीक्षेपक बंद होणार
  • ध्वनीक्षेपक वापरण्यावर मर्यादा, रात्री दहा ते सकाळी 6 ध्वनीक्षेपक बंद
  • आचारसंहितेचा भंगची मोबाईल अॅपद्वारे (C-VIGIL) तक्रार करता येणार, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणार
  • आचारसंहितेचा भंग झाल्यास कठोर कारवाई होणार – निवडणूक आयोग
  • देशात आचारसंहिता लागू, निवडणूक आयोगाची घोषणा
  • अंध मतदारांसाठी मतदार यादी ब्रेलमध्ये असणार – अरोडा
  • सर्व मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन असणार
  • 10 लाख मतदान केंद्रावर होणार मतदान – अरोडा
  • 18 ते 19 वयोगटातील मतदारांनची संख्या दीड कोटी – अरोडा
  • 2014 च्या तुलनेत 7 कोटी मतदार वाढले- अरोडा
  • यंदा जवळपास 90 कोटी मतदार – अरोडा

  • 3 जून रोजी 16 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपेल – मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा
  • निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू

  • महाराष्ट्रात दोन ते तीन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता
  • सहा ते सात टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता
  • 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता
Lok sabha 2019 प्रचारासाठी लष्कराचा वापर करू नका, निवडणूक आयोगाची तंबी
Lok sabha 2019 निवडणुका जाहीर होताच जनता भाजपच्या जाहिरातींपासून मुक्त होईल!
Lok sabha 2019 निवडणूक आयोग भाजपच्या हातचे बाहुले आहे का? आपचा सवाल