
सामना ऑनलाईन, मुंबई
लोकसभेच्या निवडणुकांसाठी देशामध्ये पहिल्यांदाच VVPAT मशिनचा वापर करण्यात येणार आहे. ईव्हीएम मशिनद्वारे केलेल्या मतदानामध्ये गडबड झाल्याचा आरोप झाला तर व्हीव्हीपॅटद्वारे मिळणाऱ्या पावतीसोबत मतांची छाननी केली जाते. अनेकांना प्रश्न हा आहे की जर या मशिनद्वारे मिळालेली पावती मतदार घरी घेऊन गेला तर त्याला परत बोलावणार कसं आणि सगळ्या पावत्या आल्या नाही तर त्यांची पडताळणी करायची कशी ? खरी बाब ही आहे की या मशिनद्वारे जी पावती तयार होते ती मतदाराला कधीच मिळत नाही. मत दिल्यानंतर ही पावती आपल्याला मशिनमध्ये पाहायला मिळते, ज्यावरून मतदार त्याने दिलेले मत योग्य ठिकाणी गेले आहे की नाही याची खात्री करू शकतो. ही प्रक्रिया नेमकी कशी होते याचा हा मराठी भाषेतील व्हीडिओ पाहा
व्हीव्हीपॅट मशिनमधील पावती मतदारांच्या हातात मिळत नाहीत. मतदारांना आपण कुणाला मतदान केलं ते या पावतीवर प्रिट होतं. ही पावती आपल्याला पारदर्शक काचेतून बघता येते. पुढचा मतदार येईपर्यंत ही पावती मशिनच्या आतल्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत साठवून ठेवली जाते. EVM मशिनवर पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरचे बटन दाबल्यानंतर मतदाराला व्हीव्हीपॅट मशिनवर कोणतेही बटन दाबण्याची गरज नसते. हे मशिन मतदान केल्यानंतर त्याची पावती तयार करण्यासाठीचे मशिन आहे आणि ही प्रक्रिया आपोआप होते.




























































