Lok Sabha Election 2024 – माजी हवाईदल प्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश, तिकीट मिळण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीआधी देशाचे माजी हवाईदल प्रमुख आर.के.एस.भदौरिया यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. भदौरिया हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे.

RKS Bhadauria यांनी जवळपास चार दशके सैन्यामध्ये कार्यरत होते. सप्टेंबर 2021मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. फ्रान्सकडून घेतलेले अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान उडवणारे ते हवाईदलाचे पहिले अधिकारी असून फान्ससोबत हा करार व्हावा यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

आर.के.एस.भदौरिया हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अद्याप अनेक राज्यात उमेदवारांची घोषणा केलेली नाही. भदौरिया यांना उत्तर प्रदेशमधून एखाद्या मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

भदौरिया यांचे शिक्षण पुण्यातील राष्ट्रीय सुरक्षा अकादमीमध्ये झालेले आहेत. जवळपास 40 वर्ष ते सैन्यामध्ये सेवेत होते. 4250हून अधिक वेळ विमान उडवण्याचा अनुभव त्यांना आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारची 26 लढाऊ विमानं उडवण्याचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. सप्टेंबर 2019 ते सप्टेंबर 2021 या काळात ते हवाईदलाचे प्रमुख होते.