ट्विटरवर चर्चा लोकसभा निवडणुकीची

213

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विरटरने नुकताच आपला वार्षिक अहवाल जाहीर केला आहे. 2019 हे वर्ष लोकसभा इलेक्शन 2019 या हॅशटॅगने गाजवले आहे. तर सर्वाधिक 10 लोकप्रिय व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. निवडणूक जिंकल्यावर मोदींनी केलेले ‘सबका साथ सबका विकास’, ‘सबका विश्वास विजयी भारत’ हे ट्विट या वर्षाचे ‘गोल्डन ट्विट’ ठरले आहे. या ट्विटला 1 लाख 17 हजार 100 रिट्विट आणि 4 लाख 20 हजार लाइक्स मिळाले आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी दुसऱया क्रमांकावर आहेत.

क्रीडा विश्वात विराट कोहली याने महेंद्रसिंग धोनीला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे ट्विट सर्वात गाजले आहे. मनोरंजन विश्वात  अभिनेता विजयने ‘बिगील’ चित्रपटाबद्दल केलेले ट्विट सर्वाधिक रिट्वीट झाले आहे. ‘लोकसभा निवडणूक’,‘चांद्रयान-2’सारखे हॅशटॅग वर्षभरात ट्रेंडिंग राहिले. तर ‘पुलवामा’ आणि ‘आर्टिकल 370’ हे विषयही ट्रेंडिंग राहिले आहेत. ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाला सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या