आता मला बरं वाटतयं, पतीच्या निधनानंतर पत्नीचे धक्कादायक विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पती पत्नीचे नाते म्हणजे आयुष्यभराची सोबत. यातील एकजण जरी अचानक गेला तर दुसऱ्याला जगणं कठीण होऊन जातं. पण इंग्लंडमधील एका महिलेने पतीचे निधन झाल्यानंतर धक्कादायक कबुली दिली. ती म्हणाली पतीचे निधन झाल्यानंतर दु:खापेक्षा मला खूप बरं वाटलं. नंतर मात्र तिने आपल्याला असा का वाटलं याचाही खुलासा केला आहे.

 इंग्लंडमधील ‘द टेलीग्राफ’ या वृत्तपत्रात महिलेने तिचा अनुभव शेअर केला आहे. त्यानुसार 25 वर्षांपूर्वी महिलेच्या आयुष्यात कोलिन नावाची व्यक्ती आली. कोलीन तिच्याकडे मॅनेजर म्हणून काम करत होता. दोघांच्या वयामध्ये बरेच अंतर होते. कोलीन महिलेपेक्षा वयाने खूपच मोठे होते. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. नंतर त्यांनी लग्न केले. त्यांना 3 मुलीही झाल्या. पण लग्नाच्या 10 वर्षांनंतर कोलीन यांना बोलताना त्रास होऊ लागला. त्यानंतर डॉक्टरांनी कोलीनच्या  काही टेस्ट केल्या. नंतर डॉक्टरांनी कोलीन यांना ‘स्पिनोकेरेबेलर अटैक्सिया’ नावाचा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान केले. मेंदूशी संबंधित असलेल्या या आजारात कोलीन पूर्णत परावलंबी झाले होते. त्यांना उठता बसता येत नव्हते. कोलीनजवळ सतत एक व्यक्ती असणे गरजेचे असल्याने महिलेला नोकरी सोडावी लागली. ती 24 तास त्यांचीच शुश्रूषा करत होती. दरम्यान, कोलीन यांची प्रकृती अधिकच खालावली. पुन्हा त्यांच्या काही टेस्ट करण्यात आल्या. त्यात त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. पण कोलीन यांनी त्यास नकार दिला.

त्यानंतर कोलीन यांनी पत्नीला त्यांच्यानंतरही आनंदी राहण्याचा व आयुष्य मनसोक्त जगण्याचा सल्ला दिला. महिलेने तो पाळला. तिने पुन्हा नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच आपण ३ मुलींचा नीट सांभाळ करू शकलो असे महिलेने सांगितले.

कोलीन यांना जाऊन 10 वर्ष झाली आहेत. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी आयुष्य जगत असल्याचे महिलेने सांगत. त्यांचे आभार मानले आहे.