डोरेमॉनमुळे सहा वर्षाच्या मुलाचे वाचले प्राण, इमारत कोसळताना आठवली ‘ही’ युक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकदा मुलं सतत कार्टुन पाहतात म्हणून पालक बेजार झालेले असतात. मात्र याच कार्टुनमुळे आज एका मुलाचा जीव वाचला आहे. डोरेमॉनचा चाहता असलेल्या एका सहा वर्षाच्या मुलाने भूकंपाच्यावेळी डोरेमॉन कार्टुनमधील ही गोष्ट आठवली आणि आपला जीव वाचवला आहे.

मुस्तफा असे या चिमुकल्याचे नाव असून तो सहा वर्षांचा आहे. लखनौमध्ये इमारत कोसळून सहा वर्षांचा मुस्तफा थोडक्यात बचावला आहे, पण या अपघातात त्याची आई उजमा आणि आजी बेगम हैदर यांना त्याने गमावले आहे. वाचलेल्या जणांपैकी मुस्तफावर एसपीएम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठिक आहे. मुस्तफा सांगतो की, त्याच्या आवडत्या कार्टून शोमुळे त्याचे प्राण वाचले.

तो म्हणतो, “मी प्रचंड घाबरलो होतो, पण त्यावेळी मला माझ्या आवडते कार्टुन’डोरेमॉन’ चा एक एपिसोड आठवला ज्यामध्ये भूकंपादरम्यान नोबिता घराच्या कोपऱ्यात किंवा पलंगाखाली आश्रय घेत होता. भूकंपादरम्यान स्वतःला कसे वाचवायचे हे शिकवले.त्यामुळे मी लगेच पलंगाखाली जाऊन लपलो. त्याने पुढे सांगितले की, मी आईला धावत ओरडताना पाहिले. बघता बघता संपूर्ण इमारत कोसळली आणि सर्व अंधार झाला. मुस्तफाचे वडील अब्बास हैदर, जे समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आहेत, ते घटनेच्या वेळी घरी नव्हते, तर त्यांचे आजोबा अमीर हैदरही थोडक्यात बचावले आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत मुस्तफाला त्याच्या आईच्या निधनाची माहिती देण्यात आली नव्हती. सोमवारी मुस्तफाच्या आजी-आजोबांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव कुटुंबाने साजरा केला होता.