काँग्रेस आमदाराचे निधन, कोरोनाची झाली होती लागण

मध्य प्रदेशातील ब्यावरा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन सिंह दांगी यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांचे निधन झाले. 23 ऑगस्टला दांगी यांना कोरोनाचे लागण झाल्याचे निदान करण्यात आले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने भोपाळ इथल्या चिरायू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना कोरोना अहवाल निगेटीव्ह आला होता, मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती असे आजतकने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

मोटारीतून प्रवास करताना मास्क आवश्यक

दांगी यांची प्रकृती खालावत गेल्याने 4 सप्टेंबरला त्यांना एअर अँम्ब्युलन्सने गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी विविध अवयव निकामी होत गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. दांगी यांच्या मृत्यूमुळे मध्य प्रदेशात आता एकूण 28 मतदारसंघ असे झालेत जिथे पोटनिवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

कोरोनामुक्त झाल्यानंतर ही काळजी घ्या

कोरोना विषाणूची जीवनसाखळी तोडण्याच्या उद्देशाने देशात लागू केलेल्या लॉक डाऊननंतरही हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 48 लाखांवरचा टप्पा गाठला आहे. देशात 24 तासांत 92,071 अशा विक्रमी संख्येत नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 48 लाख 46 ,428 झाला आहे. त्यात 9 लाख 86 हजार 598 रुग्णांवर उपचार सुरु असून दिवसभरात 1,136 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील 37 लाख 80 हजार 108 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून एकूण 79,722 नागरिक कोरोनाचे बळी ठरले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या