
ओडिसी नृत्य सादर होताना पाहणे जेवढे आनंददायक असते, तेवढाच आनंद या नृत्य प्रकाराची रंगभूषा करतानाही होत असतो.
अनेक प्राचीन मंदिरांवरील कोरलेल्या शिल्पकलांमधील वेगवेगळय़ा नृत्य प्रकारांकडे बघताना जो आनंद आपल्याला होत असतो तसाच आनंद ओडिसी नृत्यकला बघतानाही होतो. कारण त्यांची जी नृत्य करण्याची पद्धत आहे त्यामधील शारीरिक बाक, त्यामधील हाताच्या काही मुद्रा, डोळय़ांचे हावभाव, शरीरातील लय हे नृत्य बघताना आपल्याला या नृत्याच्या प्रेमात पडण्यास भाग पाडत असते.
खास पोशाख
ओडिसी नृत्यासाङ्गी लागणारे पोशाख हे ओरिसा सारी किंवा संबळपुरी साडीपासून बनविले जातात. दागिन्यांमध्ये कमरेला बेंगपटिया, मनगटात कर पंकण, दंडावर ताईत किंवा बाजूबंद, गळय़ात हारा आणि चिका, कानात कापा, कपाळावर मांगतिका किंवा बिंदी, अंबाडय़ावर रत्नजडीत जाळी, डोक्यावर महामुकुट व अंबाडय़ाच्या भोवती फुलांचा हार ज्याला गोभा म्हणतात. अंबाडय़ात खोचलेला ताहिया जो पुरीमधील जगन्नाथ स्वामींच्या मंदिराचा कळस म्हणून संबोधित करतो. पायामध्ये पाऊंजी म्हणजे पैंजण आणि घुंगरू यांचा समावेश असतो.
ओडिसी नृत्य ही ओरिसा प्रांतातील एक अभिजात नृत्यशैली आहे. ओडिसामधील उदयगिरी येथे या कलेचा जन्म झाला. भरतनाटय़म आणि कथक या नृत्य प्रकारांचे मिश्रण या नृत्यात दिसते. मंदिर शिल्पांच्या मुद्रा हे ओडिसी नृत्याचे विशेष आहे. कोणार्क येथील सूर्यमंदिर तसेच जगन्नाथ पुरी येथील मंदिर हे या नृत्याची आधारभूमी मानले जाते. ओरिसामध्ये नवव्या शतकापासून देवदासींची प्रथा सुरू झाली. या ओडिसीच्या आद्यनर्तिका होत.
नवव्या शतकात भितरी माहरी व बाहरी माहरी या देवदासींच्या रूपातील नर्तिका होत्या. कालांतराने तरुण नर्तक देवळात नेमले गेले. त्यांना गोटीपुवा असे म्हणत. गोटीपुवा हे कृष्ण-राधेच्या समोर हा डान्स करत. राधा-कृष्णाच्या मंदिरात आपली कला सादर करत. मात्र कालांतराने या नृत्य प्रकाराचा ऱहास होत गेला आणि 1950 च्या दशकात मात्र याचे पुनरुज्जीवन झाले. केलूचरण महापात्रा, गंगाधर प्रधान, पंकज चरणदास, देवप्रसाद दास यांनी या नृत्याचा प्रचार करून त्याला मान्यता मिळवून दिली, तर इंद्राणी रहमान यांनी जागतिक पातळीवर या नृत्यकलेला पोहोचवले.
नृत्य पद्धती व शास्त्र या दृष्टीने ओरिसा नृत्य इतरांहून भिन्न आहे. त्यातील प्रमुख नृत्यावस्था त्रिभंगी म्हणजे तीन प्रकारे शरीराला बाक देणे. मान, पंबर आणि ढोपर या ङ्गिकाणी बाक देऊन हे नृत्य सादर केले जाते, तर चौकभंगी ही अवस्था जगन्नाथ स्वामींच्या मूर्तीवर आधारित असते. चौक म्हणजे आयताकृती. नृत्य सादर करताना शारीरिक हालचालींमधून जी आयताकृती चौकट अवस्था असते तिला चौकभंगी असे म्हणतात. पादभेद, भूमी, चारी भ्रमरी, भंगी, हस्त किंवा मुद्रा या ओडिसी नृत्याच्या अवस्था आहेत.
या नृत्याची रंगभूषा करताना नर्तकाच्या सर्व अंगाला केशर लावण्यात येत असे. मात्र अलीकडे आपण जसा फाऊंडेशनचा बेस करतो त्याप्रमाणेच बेस करण्यात येतो व त्यावर गोरचना म्हणजे सरपटणाऱया प्राण्यांसारखी नक्षी कपाळावरून खाली गालापर्यंत काढली जाते. भुवयांच्या मध्यभागी कुमकुम तिलक असतो. त्याच्याभोवती पांढऱया रंगात उभ्या रेषांनी डिझाइन केली जाते. हनुवटीवर छोटासा तीळ असतो. डोळय़ांमध्ये काजळ घातले जाते व आयलाइनरने डोळय़ांना वरून आणि खालून असा एक सुंदर आकार दिला जातो. बोटांना आलता लावला जातो. ओङ्गांवर उङ्गावदार डार्क रंगाची लिपस्टिक लावली जाते. गालांवर रुज लावताना तो गालांवरून कानपट्टीपर्यंत नेत थोडासा डार्कच लावला जातो.
शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
[email protected]





























































