
सामना ऑनलाईन, मुंबई
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महाधिवक्त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आशुतोष कुंभकोणी हे राज्यमंत्र्याचा दर्जा मिळालेले पहिले महाधिवक्ता असतील. महाराष्ट्र सरकारने गुरुवारी याबाबतचा निर्णय जाहीर केला होता.
राज्यमंत्री झाल्याचा महाधिवक्त्यांना काय फायदा होईल ?
- सरकारी निवासस्थान मिळेल
- २० लाखांपर्यंतची नवी गाडी घेता येईल
- न्यायालयांमध्ये प्रतिनिधीत्व करण्यासाठी दरमहा मानधन मिळेल
- राज्यभरात कुठल्या न्यायालयात जाण्यासाठी किंवा सरकार कार्यक्रमांना जाण्यासाठी विमानाच्या बिझनेस क्लासने प्रवास करता येईल
- टेलिफोन बिलासाठी दरमहा ३ हजार रूपये मिळतील
सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे आता महाधिवक्त्यांना सरकारी कार्यक्रमात राज्यमंत्र्यांच्या पंक्तीमध्ये आसन मिळेल. पंजाब आणि हरियाणाने महाधिवक्त्यांना थेट कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला आहे. महाधिवक्त्याला मंत्री पदाचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे तिसरं राज्य ठरले आहे.



























































