अनिल देशमुख यांना अटक, ईडीकडून 10 तास चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँगेसचे नेते अनिल देशमुख यांना आज ‘ईडी’ने अटक केली. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी देशमुखांवर शंभर कोटी रुपये वसुलीचा गंभीर आरोप केर्ली होता. ‘ईडी’ने याप्रकरणी देशमुख यांना अटक केली. उद्या सकाळी 11 वाजता त्यांना सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ईडीने याप्रकरणी देशमुख यांना पाच वेळा समन्स पाठवले होते, पण ते एकदाही हजर झाले नव्हते. ते नॉटरिचेबल झाले होते. आज सकाळी ते स्वतःहून ‘ईडी’समोर आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंहसुद्धा होते. अधिकाऱयांनी त्यांची तब्बल 10 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली.